या कारणामुळे विधानसभा निवडणुकीत अपयश !  राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये आता पक्षांतर्गत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, तर नगर जिल्हाध्यक्षांसह बूथ अध्यक्षपदाच्या निवडणूक ३० नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.

 

या निवडणुकीच्या निमित्त खासदार तथा पक्षनिरीक्षक गिरीश बापट यांनी मंगळवारी नगरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

 

विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाचे खापर आमदार राधाकृष्ण विखे यांनी भाजपच्या बूथप्रमुखांवर फोडले असून, विधाननसभा निवडणुकीत बूथप्रमुख शोधूनही सापडले नाहीत. मिळालेल्या मतांची जबाबदारी बूथप्रमुखांवर निश्चित करावी, असे विखे यांनी नगरमध्ये सांगितले.

 

बापट यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीकडे आमदार राधाकृष्ण विखे वगळता विद्यमान व माजी आमदारांनी पाठ फिरवली. पक्षाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, बबनराव पाचपुते यांच्यासह माजी आमदार मंत्री राम शिंदे, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे यांनी पाठ फिरवली.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment