आमदार लंकेवर कौतुकाचा वर्षाव सुरूच; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने केली विचारपूस

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके सध्या आपल्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना करत असलेल्या मदतीमुळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनले आहे.

यांच्या या कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील घेतली आहे. पाटील यांनी लंके यांच्या कार्याबद्दल मंत्रालयामध्ये सन्मान करून एक पत्र दिला आहे.

या पत्रात जयंत पाटील यांनी म्हटले आहे कि, कोरोना या जागतिक संकटाचा मुकाबला करताना सर्वसामान्य जनतेसाठी आपण करोत असलेल्या कार्याबद्दल सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन.

आपले राष्ट्रीय नेते खा.मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निर्देशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणानुसार २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण अशा प्रकारचे कार्य चालते.

त्याचाच परिपाक आपण करीत असलेल्या कार्यातून दिसून येत आहेत. आपल्या कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतशी जोडला जात आहे. दरम्यान राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढतच आहे.

राज्यात आरोग्य यंत्रांवर ताण वाढू लागला आहे. अनेक रुग्णांना बेड मिळत नाही. अश्या परिस्थितीमध्ये अनेक जणांनी मदतीचे हात कोरोनाबाधित रुग्णांना दिले आहे. यातच सध्या आमदार निलेश लंके यांच्या कार्याची दखल सातासमुद्रापार घेतली जात आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|