दिलासादायक ! जिल्ह्यातील गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. जिल्ह्यातील एकही तालुका असा राहिला नाही जिथे कोरोनाने आक्रमण केले नाही…

जिल्ह्यातील गावपातळीवर कोरोनाचा शिरकाव झाला असताना आता काही गावांनी कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु केली आहे. नगर तालुक्यातील भोयरे खुर्द हे गाव कोरोनामुक्त झाले आहे.

मागील १५ दिवसांपासून या गावामध्ये एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. विशेष म्हणजे येथे मृत्यू दर शून्य आहे.

दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने सरपंच राजू आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त होऊन दाखवलं आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग प्रचंड आहे.

अनेक उपाययोजना शासन आणि प्रशासन राबवत आहे. परंतु कोरोना हटण्याचे नाव घेत नाही. परंतु नगर तालुक्‍यातील एका छोट्याशा भोयरे खुर्द गावाने सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त होऊन दाखवले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News