अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कुटुंबातील कत्र्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. घरखर्च भागवताना या कुटुंबाची मोठी ओढाताण होते.
हे लक्षात घेऊन युवान संस्थेच्या मिशन संवेदना उपक्रम व ग्रिव्ह इंडियाच्या सहयोगाने गरजू कुटुंबांना तातडीचा आधार दिला जाईल, अशी माहिती स्नेहालयचे संस्थापक गिरीश कुलकर्णी व शिर्डीचे प्रतिनिधी अशोक वंसाडे यांनी दिली.
याबाबत वसांडे यांनी पत्रकात म्हटले, की ज्या गरीब व गरजू कुटुंबातील व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा पात्र व्यक्तींनी १५ मे २०२१ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह स्नेहालयच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
कोरोनामुळे आई, वडील गमावणाऱ्या मुला- मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी युवान ही संस्था या पुढील काळात घेणार आहे. यासाठी समाजातील दानशूरांनी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.
वंचित कुटुंबाच्या मदतीसाठी या संस्थेने पुढाकार घेतला असून नागरिकांनी नगर जिल्ह्यातील स्नेहालयच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रवीण मुत्याल, यशवंत कुरापट्टी, युवानचे संस्थापक संदिप कुसळकर यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|