आ.लंकेंच्या कोव्हिड सेंटरला देशविदेशातून तब्बल इतक्या कोटींची मदत जमा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-कोरोनाच्या वैश्‍विक महामारीत गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ रात्रंदिवस रूग्णांची सेवा करणाऱ्या आमदार नीलेश लंके यांच्या सेवाभावावर देशविदेशातील नागरीकांनी शिक्कामोर्तब केले आहे !.

आ. लंके यांनी कोरोना बाधित रूणांसाठी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरासाठी देशविदेशातून तब्बल सव्वा कोटींची रोख मदत जमा झाली असून माळवातील नागरीकांना तांदूळ तर कोकणवासीयांनी रूग्णांसाठी हापूस आंबे पाठविले आहेत ! .

१४ एप्रिल रोजी आ. लंके यांनी भाळवणी येथील नागेेश्‍वर मंगल कार्यालयात १ हजार १०० बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू केले. त्याच दिवशी लंके समर्थकांसाठी शासकिय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सुमारे विस लाख रूपयांची मदत घोषीत करून लंके यांच्या या निर्णयास ठोस समर्थन दिले.

दुसऱ्या दिवशीपासून तालुक्यासह तालुक्याबाहेरून मदतीचा ओघ सुरू झाला. कोणी भाजीपाला, कोणी फळे तर कोणी धान्याची पोती भाळवणी येथील आरोग्य मंदीरात आणूण टाकली. रूग्णांसाठी अंडी, सुकामेवा आदींचही रिघ लागू लागली.

धान्याची तर रास लागल्याने आता धान्य पाठवू नका इतर आवष्यक मदत पाठवा असे सांगण्याची वेळ आली. प्रशासनाकडून रूग्णांसाठी औषधे देण्यात येत आहेत. मात्र पुरवठा अपुरा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लाखो रूपयांची औषधे काही तासात जमा झाली ! आजूनही होत आहेत.

आ. लंके यांच्या या सेवाभावी कामाची किर्ती सोशल मिडियाच्या माध्यमातून सातासमुद्रापार गेली. राज्यपातळीवरील वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रांनीही आ. लंके यांच्या या कामाची ठळक दखल घेतली. त्यानंतर देश विदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला. केवळ लंके यांच्या सेवाभावावर फिदा होउन पॅरिस,

दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, कॅनडा आदी देशांमधून थेट आ. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या खात्यावर रोख रक्कम जमा होऊ लागली. देश विदेशातील मदतीचा ओघ दिवसेंंदिवस वाढतच असून राज्याच्या जवळपास सर्वच जिल्हयांमधून मदत जमा होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News