अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे . तसेच संपूर्ण जिल्ह्यात कठोर नियम देखील लागू करण्यात आले आहे .
असे असतानाही अनेकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. अशा बेशिस्त व्यक्तींवर पालिकेच्या दक्षता पथकाकडून कारवाई केली जात आहे.
नुकतेच नगर शहरात महापालिकेने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचे पालन न करता चोरून विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत दक्षता पथकाने दोन दिवसांत दीड लाखांचा दंड वसूल केला आहे.
बुधवारी कापडबाजारातील एका दुकानदराला १७ हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती पथकाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. मात्र, दुकाने बंद करून कापड, किरणा मालाची विक्री सुरू असल्याने दुकानांत गर्दी होत आहे.
त्यामुळे महापालिकेच्या दक्षता पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे. दक्षता पथकाने गंज बाजार, माळीवाडा, ख्रिस्त गल्ली, ग्राहक भांडार जवळ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली.
तसचे दक्षता पथक क्रमांक एक यांच्याकडून सावेडी येथील दुकाने उघडल्याने दोन दुकानदारांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड केला.
याशिवाय कापड बाजार दुकानदाराला 17 हजार, तर फळ विक्रेत्याला एक हजाराचा दंड करण्यात आला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|