अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- देशात कोरोनाने कहर केला. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) महाराष्ट्रातील ४५ हजार डॉक्टर्स अहोरात्र रुग्णालयात आपले सर्वस्व पणाला लावून जीव धोक्यात टाकून आणि कुटुंबातील सर्वांपासून वेगळे राहून काम करीत आहेत.
ऐकीव बातम्यांवर विश्वास ठेवून आपला जीव धोक्यात घालू नका, असेही आवाहन करण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे
श्रीरामपूर अध्यक्ष डॉ. भूषण देव, उपाध्यक्ष डॉ. संजय शेळके, सचिव डॉ. सुनील गोराणे, खजिनदार समीर बडाख यांनी सांगितले. लोकांनी न घाबरता काही गोष्टीने पालन करणे आवश्यक आहे.
आपल्याला कुठलेही लक्षण दिसल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोनाची चाचणी वेळेवर आणि लवकर करा. आजार अंगावर काढू नका.
ऐकिवात असलेल्या बातम्यांवर विसंबून राहून स्वतः उपचार करू नका. कुठल्याही शंका असल्यास आयएमएच्या डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|