अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- देशात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे, याच मुद्द्यावरून केंद्रावर टीका करणारे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सध्याच्या कोरोना स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
सध्या कोरोना लस, ऑक्सिजन, औषधे जशी गायब आहेत तसे देशाचे पंतप्रधानही गायब झाले आहेत. आता फक्त ते सेंट्रल विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि फोटोसेशन या कामातच अडकून आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी वारंवार टीका केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळामध्ये सभांमध्ये होणारी प्रचंड गर्दी यावरून त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले होते.
आता पुन्हा एकदा कोरोनाच्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली.कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आले असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
त्यांनी ट्विट केली की ‘लस, ऑक्सिजन आणि औषधांपाठोपाठ पीएमही गायब आहेत. आता फक्त उरले आहे ते सेंट्रल विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि इकडचे तिकडे पंतप्रधानांचे फोटो.
याचबरोबर राहुल गांधींनी ‘जेव्हा देश संकटाचा मुकाबला करत असतो त्यावेळी सरकारने स्वतःला विचारले पाहिजे की लोकांकडून घ्यायला पाहिजे की त्यांना द्यायला पाहिजे.
हे त्यांच्या फायद्याचे ठरले की तोट्याचे. पण, भारत सरकार आपले कर्तव्य बजावण्यास सक्षम नाही. त्यामुळे लोकांनी एकमेकांची मदत करण्यासाठी एकत्र यायला हवे.’ असे दुसरे ट्विट केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|