अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. यातच कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये आढळून आला आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी आरोग्य सुविधांवर भर देत असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील खळी येथे दोन वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद आहे. कोरोनाच्या या संकट काळात ते सुरु करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील
यांच्या पाठपुराव्यातून तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंदाजे 60 लाख रुपये खर्च करून सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी या उपकेंद्राचे उद्घाटन होऊनही हे उपकेंद्र नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झालेले नसल्यामुळे हे उपकेंद्र कोविड – 19 च्या संकटकाळात सुरू करावे, अशी मागणी खळी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कर्मचार्यांअभावी खळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद असल्याची उत्तरे प्रशासनाकडून दिली जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कोविड – 19 चे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून याच पार्शवभूमीवर खळी येथील आरोग्य उपकेंद्र सुरु करावे अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|