चाळीस हजारांची शिसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- नगर शहरातील नागापूर एमआयडीसीमधील एका कंपनीमधून शिसेची चोरी करणार्‍या दोघा चोरट्यांना पोलिसांनी पडकले आहे.

याबाबत पोलीस ठाण्यात संतोष पद्माकर डबीर (वय 49 रा. पाईपलाईन रोड, नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी अजित चंद्रभान शिंदे आणि आकाश जयसिंग आगळे या दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरूवार दिवशी वरील दोघे चोरटे एक वाहन एमआयडीसीमधील एक्साईड कंपनीमध्ये बॉक्स बॅटरी व प्लेट नेण्यासाठी आले.

शिंदे आणि आगळे बॉक्स बॅटरी व प्लेट वाहनात भरत असताना एक्साईड कंपनीचे सिक्युरिटी रवींद्र इंगळे यांनी त्यांच्या वाहनाची तपासणी केली.

तपासणीदरम्यान वाहनामध्ये लीड (शिसे) याचे नऊ बंडल आढळून आले. त्यानंतर इंगळे यांनी हा प्रकार प्लँट हेड संतोष डबीर यांना कळविला.

त्यानंतर तपासणी केली असता शिंदे आणि आगळे यांनी 40 हजार रुपयांचे लिडचे नऊ बंडलची चोरी केल्याचे निर्दशनास आले. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe