अहमदनगर- पुणे महामार्गावर एकाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर- पुणे महामार्गावरील सर्वात धोकादायक ठिकाण असलेल्या सुपा बस स्थानक चौकात सोमवारी सकाळी 9 ते 9.30 दरम्यान एक जे. सी.बी. मशीन पारनेरकडून चौक ओलांडून पुण्याकडे वळत होता.

तेवढ्यात अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने एक कंटेनर क्र. MH 20 DE 1553 हा जोरात येत होता. ऐन चौकात जे. सी. बी. व कंटेनर याची जोरात धडक होऊन दोन्ही वाहने रस्त्याच्याकडेला असलेल्या चहाच्या दुकानाकडे सरकली .

त्यावेळी तेथे उभे असलेले नसिर अब्दुल शेख व संतोष यादव अवचिते यांच्या आंगावरती कंटेनर गेला. कंटेनरची धडक इतकी जोरात होती की त्यात नसिर अब्दुल शेख हे जागीच ठार झाले.

तर संतोष यादव औचिते हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात नेले. याबाबत शौकत कादर शेख यांनी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान जे. सी. बी. मशीन व कंटेनर यांच्या धडकेत रस्त्यावर उभे असलेले नसीर शेख हे जागीच ठार झाले तर संतोष औचिते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर जे.सी.बी. मशिनवाला पळून गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment