केडगावला शिवसेनेच्या पाठपुराव्याने एक लसीकरण केंद्र सुरु

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- शहरासह उपनगरात असलेल्या लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी होऊन लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यासाठी

शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पाठपुराव्याने केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

यामुळे एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांचे लसीकरण होत आहे. नव्याने सुरु झालेल्या लसीकरण केंद्राची शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी पहाणी केली. यावेळी नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, विजय पठारे, डॉ.गिरीष दळवी, सुनिल सातपुते, विशाल वालकर,

आशा सेविका अश्‍विनी पाटील, निलम पारखे, कल्पना जोशी, शिता शेळके आदी उपस्थित होते. शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, महापालिका लसीकरण कार्यक्रमात फोल ठरली असून, नियोजनाचा बोजवारा उडाला आहे.

लसीकरण गर्दीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे. लसीकरण केंद्र वाढविण्यास विनंती केली असता, भूषणनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. शहरात टप्प्याटप्प्याने दहा लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. केडगाव येथील लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने,

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी सातपुते यांनी केली होती. या मागणीस मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी मंजूरी दिली असून, सदर केंद्रावर लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

पाठपुरावा करुन लसीकरण केंद्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल केडगाव येथील नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे आभार मानण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe