अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अर्धे शटर खाली करून सर्रास विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
यामुळे काही व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार घडत आहे. यामुळे कोरोना वाढीचा धोका संभवतो आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्यासाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ ठरवून दिली आहे.
परंतु ठरवून दिलेल्या वेळेनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी राहत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांना स्वत: जाऊन ‘दुकाने बंद करा’.
असे सांगावे लागते, त्यामुळे पोलीस आले तरच शटर खाली असे चित्र सध्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पहायला मिळते आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून निर्बंध घालून दिले आहेत. १५ मे पर्यंत लागू केलेल्या कडक निर्बंधांची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन झटत आहे.
मात्र, दुसरीकडे नागरिक, व्यवसायिक प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.
कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य अजूनही अनेकांना समजून आलेले दिसत नाही. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|