अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. रुग्णांना उपचारासाठी जिल्हाभर कोविड सेंटर तातडीने सुरु करण्यात आले आह .
यातच शिर्डी येथे चार हजार रुग्णांवर उपचार होईल असे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात येत आहे. मात्र आता याच जम्बो कोविड सेंटरची विकेंद्रीकरण व्हावे अशी मागणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांच्यासह भाजपच्या वतीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिर्डीत उभारण्यात येणार्या 4200 खाटांचे जम्बो कोविड सेंटरऐवजी या सेंटरचे विकेंद्रीकरण करून सध्या या तालुक्यात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये थोड्याफार प्रमाणात खाटांची संख्या वाढवावी.
तसेच जम्बो कोविड सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री, डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ कसा व कोठून उपलब्ध होईल, याबाबत खुलासा होणे आवश्यक आहे. सध्या स्थितीला श्री साईबाबा संस्थानकडे वैद्यकीय कर्मचार्यांची कमतरता आहे आणि जे आहेत ते गेल्या वर्षभरापासून प्रचंड तणावात सेवा देत आहे.
अशात त्यांच्यावर अति ताण-तणाव आल्यास सर्व व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जम्बो रुग्णालय आजूबाजूच्या दहा तालुक्यांसाठी विचारात घेऊन केले जात आहे. परंतु रुग्णालयाचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.
त्यापैकी संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर येथे पाचशे खाटांच्या रुग्णाची व्यवस्था सध्या चालू आहे. त्यातच थोड्याफार प्रमाणात वाढ करण्यात यावी. गरज पडल्यास साईबाबा संस्थांनने मदत करावी. जेणेकरून कोणत्याही एका ठिकाणी कामाचा व्याप वाढणार नाही.असे देखील निवेदनात म्हंटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|