शिर्डीतील त्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक माहिती समोर

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी :- येथील हॉटेल साईधाममध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सहाजणांसह तीन महिलांवर गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे

या व्यवसायाचे कनेक्शन थेट बिहारपर्यंत असल्याचे शिर्डी पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. मुंबई महानगरातून सटाणा येथील रहिवासी असलेल्या गौरव दादाजी सोनवणे याला ताब्यात घेतल्यानंतर बिहार राज्यातील बस्तर येथील रामनाथ भगत (वय ३२) याला अटक करण्यात आली.

या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींचा आकडा १२ पुरुषांसह तीन महिला मिळून १५ पर्यंत पोहचला असून तीन कुंटणखाने चालविणाऱ्या महिला, तीन स्थानिक एजंट असून त्यांना बाहेरून शिर्डीकरिता मुली व महिला पुरविणारे गौरव दादाजी सोनवणे व त्यांचा बिहार राज्यातील मित्र रामनाथ भगत यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

यातील काही जणांच्या मोबाइलमध्ये मुली व महिला यांचे फोटो असल्याचे दिसून आले आहे. शिर्डीत हॉटेल साईधनवर छापा टाकून जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई करण्यात आली.

अटक केलेल्या एजंटकडे असलेल्या मोबाइलमध्ये असलेल्या महिलांचे फोटो पाहता या व्यवसायाची पाळेमुळे फार दूरपर्यंत पोहोचल्याचे पुढे आले आहे. ज्यांना अटक करण्यात आली, अशा तरुणांचे काही महिन्यांचे कॉल रेकॉर्डिंग (सीडीआर) मागविण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून एकमेकांशी संवाद झालेल्या इसमांची देखील पोलीस चौकशी करणार आहेत.

बिहार येथील रामनाथ भगत याला ताब्यात घेतल्यामुळे आणखी खळबळजनक माहिती पुढे येणार आहे. भगत हा परराज्यातील महिला शिर्डीत येणाऱ्या आंबटशौकीन ग्राहकांना पुरवित होता. यांच्या मोबाइलवरील ग्रुपचा देखील बारीकसारीक अभ्यास केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment