अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- रुग्णांच्या शेजारी असलेले मृतदेह लवकर हलवावेत तसेच पक्के बिल द्यावे, अशी मागणी केल्याच्या रागातून नगर येथील एका कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकाला लोखंडी गजाने मारहाण केली.
नगर शहरातील स्वस्तिक चौकातील पॅसिफिक केअर सेंटर या खासगी कोविड रुग्णालयात ही घटना घडली. याप्रकरणी रुग्णांचे नातेवाईक आकाश भागवत डोके (वय २६) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
यावरून नगर येथील डॉक्टरसह पाचजणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर डॉक्टरांनीही नगरच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नातेवाईकांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
जामखेड नगरपालिकेतील लिपीक आकाश भागवत डोके (वय २६) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे मेहुणे भागवत सुपेकर यांना करोना संसर्गाची लागण झाल्यामुळे ५ मे रोजी नगरच्या या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी आकाश डोके व संजीव जाधव सुपेकर यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुपेकर हे खूप घाबरलेले होते. त्यांच्या आजूबाजूला ३ ते ४ मृतदेह अनेक तासांपासून पडून होते. ते मृतदेह हलविण्याची विनंती डोके यांनी कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना केली.
मात्र, त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे डोके यांनी तेथील प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. दरम्यान सुपेकर यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने डोके याना २ लाख ६५ हजार रुपये भरण्यासाठी सांगितले. त्यावेळी डोके म्हणाले, रीतसर बिल भरण्यास तयार आहे.
परंतु, जास्त बिल भरणार नाही. पक्के बिल द्या. असे म्हटल्याचा राग आल्याने डॉक्टरसह कर्मचाऱ्याने आम्हाला मारहाण केली.
या प्रकरणी डॉ. प्रशांत जाधव, कृष्णराज पाटील, बालकृष्ण पाटील, यश पोळ, बलराज पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर डॉ. जाधव यांनीही डोके आणि त्यांचे मामा जाधव यांच्यासह चार जणांविरुद्ध नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम