राजकीय दबावातून शहरात लसीचा काळाबाजार सुरु? चौकशीसाठी काँग्रेसचे आयुक्तांना साकडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-नगर महापालिकेतील सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय दबावातून खासगी जागेत महापालिकेचे बेकायदेशीरपणे लसीकरण सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी महापालिका केंद्रावरील परिचारिकांना एका हॉटेलवर बोलावून लस घेतल्याची चर्चा सुरू आहे.

या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मनपातील सत्ताधारी यांनी मनपा केंद्रावरील परिचारिकांना लस घेऊन एका खासगी ठिकाणी बोलावले गेले व तिथे काहींचे लसीकरण झाल्याची चर्चा आहे.

यावरून काँग्रेसने आयुक्तांना काही प्रश्न केले आहेत. काँग्रेसकून आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार सावेडी मनपा आरोग्य केंद्रावरून आपल्या कर्मचाऱ्यांनी लस डॉन बॉस्को या ठिकाणी नेल्या, हे खरे आहे का? डॉन बॉस्को हे ठिकाण लस देण्याचे मनपाचे अधिकृत ठिकाण आहे का?

सावेडीच्या मूळ केंद्रावर किती आणि डॉन बॉस्को येथे किती लस नेण्यात आल्या? ही संख्या कोणी आणि कशाच्या आधारे निश्चित केली? याची मनापा रेकॉर्डला मनपा कार्यालयापासून ते प्रत्यक्ष लस घेतलेल्या नागरिकांपर्यंत सर्व नोंदी करण्यात आल्या आहेत का? तेथे ज्यांना लस देण्यात आली,

त्यांची आधी नोंदणी केली होती का? जाहीर करण्यात आलेल्या यादीतील नावे असणाऱ्या नागरिकांनाच या केंद्रावरून लस देण्यात आली का? डॉन बॉस्को येथून आपल्या परिचारिकांना राजकीय दबावातून एका खासगी ठिकाणी खासगी वाहनातून नेण्यात आल्याचे खरे आहे का?

लसीकरणाच्या शासकीय वेळेत शासकीय केंद्रावर उपस्थित न राहता खासगी ठिकाणी आपल्या परिचारिका कशा काय गेल्या? त्याबाबत मनपाच्या कोणत्या वरिष्ठांनी दबाव आणला होता? सदर खासगी ठिकाण हे मनपाचे अधिकृत लसीकरण केंद्र आहे का?

या ठिकाणी कोणाचे लसीकरण करण्यात आले? शासकीय मालमत्ता असणाऱ्या लस सदर खासगी जागेत नेण्याबाबत मनपा आयुक्त यांचे आदेश होते का? मनपाच्या लसीकरण केंद्रातून लस बाहेर गेल्याच कशा? लस बाहेर नेवून मनपाचे कोणी लसीचा काळाबाजार करीत आहे का?

यात कोणा कोणाचा सहभाग आहे? त्यांच्यावर कोणी राजकीय दबाव आणला का? या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी कोणती कारवाई केली आहे का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

दरम्यान यावरून पुन्हा एकदा हे स्पष्ठ झाले कि, लोकप्रतिनिधी नगरकरांच्या आरोग्यापेक्षा तसेच ज्यांनी सत्ता मिळवून दिली त्यांना विसरून स्वतःची काळजी घेण्यात मग्न आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe