तलवारीचा धाक दाखवत दहशत माजविणाऱ्या ‘शाहरुख’ ला अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- श्रीरामपूर येथे एक इसम दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत आहे. याबाबतची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली.

त्यावरून पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी गेले असता एक इसम दोन हातात दोन तलवारी घेऊन येताना दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जाऊ लागला.

त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव शाहरुख अन्वर शेख (वय-21 रा. शनी चौक, वॉर्ड नंबर 2 ,श्रीरामपूर) असे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या समोर त्यांची अंगझडती घेतली, त्यामध्ये त्याच्या ताब्यात असलेल्या दोन लोखंडी तलवारी जप्त केल्या.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मोहन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहरुख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe