अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. यामुळे राज्यासह प्रत्येक जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे.
यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्हाबंधी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यावर प्रवासासाठी ई- पासची सोय करण्यात आली आहे. याचा अनेक जणांनी प्रवासासाठी उपयोग केला आहे.
शासनाने कडक निर्बंध लागू करत २३ एप्रिलपासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती केली आहे. आवश्यक कारण असेल तरच पोलिसांकडून पास देण्यात येतो. हॉस्पिटलमध्ये अथवा जवळच्या नातेवाइकाच्या अंत्यविधीला जायचे असेल तर पोलीस तत्काळ पासला मंजुरी देतात.
आवश्यक ती कागदपत्र जोडलेले असेल तर बारा तासांच्या आत पास दिला जातो. अनावश्यक कारण नमूद असल्यावर तो अर्ज रद्द केला जातो. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर विभागामार्फत अर्जाची छाननी करून ई-पास दिला जातो.
दिवसाला ५५० ते ६०० पास सध्या दिले जात आहेत. दरम्यान पोलिसांनी २० दिवसांत तब्बल १७ हजार ई-पासचे वितरण केले. ई-पाससाठी योग्य कारण व आवश्यक ती कागदपत्र डाऊनलोड केलेली असतील तर पोलिसांकडून तत्काळ पास दिला जातो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम