‘त्यांचा’ पाय घसरला अन क्षणात सर्व काही संपले!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 : –  सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार उडाला आहे. एकीकडे कोरोनाच्या विळख्यात सापडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. तर दुसरीकडे किरकोळ अपघात घडून त्यात देखिल काहीजण बळी पडत आहेत.

नुकतीच पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे पाय घसरून विहिरीत पडल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नारायण भाऊसाहेब पाठक असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

अतिशय कष्टाळू आणि गरीब कुटुंबातील असलेले पाठक हे काल सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विहिरीजवळ शेतात काम करत होते.

हे काम करत असताना अचानक पाय घसरून ते थेट विहिरीत कोसळले यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे घाटशिरस परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पाठक यांच्या मृत्युनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe