अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.
यातच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र कवीस सेंटर सुरु करण्यात आले आहे. पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ व बर्ड संस्था
यांच्या संयुक्त विद्यमाने पाथर्डी शहरात सुरू केलेल्या महिलांसाठीच्या स्वतंत्र कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत १४३ महिलांनी कोरोनावर मात केली.
सध्या ४० महिला येथे उपचार घेत आहेत. २२ एप्रिलला हे कोविड सेंटर सुरू झाले. येथे महिला रुग्णांसाठी सकाळी, चहा-नाश्ता, दुपारचे जेवण व सायंकाळचे जेवण असा दिनक्रम आहे.
येथे जेवण, नाश्ता चांगल्या दर्जाचा दिला जातो. यामुळे रुग्णांना एक मानसिक आधार देखील मिळतो. या सेंटरमध्ये काही मुलीसुद्धा उपचार घेत आहेत.
प्रसन्न वातावरण त्यामुळे आजाराचा तणाव मनावर राहत नाही. येथे १८३ महिला रुग्ण दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १४३ महिला ठणठणीत बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. ४० महिला उपचार घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम