तलवारी घेऊन फिरणारा युवक अखेर अटकेत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- श्रीरामपूर शहरातील साईनगर वार्ड नं.२ येथे दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत करणाऱ्या शाहरुख अन्वर शेख (२१ वर्ष रा.शनि चौक वार्ड नं.२ श्रीरामपूर ) या युवकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

साईनगर वार्ड नं.२ श्रीरामपूर येथे एक युवक दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन फिरत होता. दरम्यान, पोलिस त्या दिशेने जात असता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला.

पाेलिस निरीक्षक संजय सानप, हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नरवडे, महेंद्र पवार, पंकज गोसावी, सुनील दिघे यांच्या पथकाने पाठलाग करुन त्यास पकडले.

त्याला नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शहारुख अन्वर शेख असे सांगितले. या युवकाकडून दोन तलवारी जप्त केल्या. कॉस्टेबल महेंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe