अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-नेवासा तालुक्यातील चांदा शिवारामध्ये बेकायदेशीर कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाला सोनई पोलिसांनी जेरबंद केले आहे.
चांदा शिवारात कुकाणा ते घोडेगाव रोडवर अशोक उत्तम फुलमाली,राहणार शार्ञीनगर, चांदा हा सराईत गुन्हेगार कट्यासह फिरत असुन तो हा कट्टा कुनालातरी विक्री करण्याच्या हेतुने या ठिकाणी आला असल्याची खबर सोनई पोलिसांना मिळाली होती.
सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे,सहाय्यक फौजदार संजय चव्हाण,पो.हे.दत्ताञय गावडे,शिवाजी माने,विठ्ठल थोरात,बाबा वाघमोडे,अदिनाथ मुळे,
रवी गर्जे,गोरक जावळे,मारूती पवार आदिंच्या पथकाने तात्काळ शनिवारी राञी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान चांदा शिवारात सापळा रचुन छापा टाकला असता अशोक फुलमाली हा एका गावठी कट्यासह दोन जीवंत काडतुसे बेकायदा वापरताना आढळून आला.
त्याची विना नंबरची होंडा गाडीसह पोलिसांनी त्यास पकडले असुन त्यास गजाआड केले आहे. सदर आरोपी विरोधात सोनई पोलिस ठाण्यांमध्ये पो.हे. शिवाजी माने यांच्या फिर्यादीवरून गुरन.
160 /2021 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,7/25 महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर पकडलेला आरोपी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असुन यापुर्वीही सोनई पोलिस ठाण्यात त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे आदिंच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलिसांनी हि कामगिरी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम