अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे हाँटेल काका या ठिकाणी दारु विक्री केली जात असल्याचे लक्षात येताच सदर धाब्याची तपासणी केली करून दारू ताब्यात घेतली.
दरम्यान राहुरीचे प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप व तहसिलदार एफ.आर.शेख हे विकऐंड लाँकडाऊनची पहाणी करीत असताना हा प्रकार आढळून आला.
प्रांतधिकारी जगताप व तहसिलदार शेख यांनी हाँटेल मालकाला लपवून ठेवलेली दारु बाहेर काढण्यास सांगितली.
तहसिलदार यांनी हाँटेलवर छापा टाकल्याने राहुरी पोलिसांचे अवैध धंद्यांना पाठबळ असल्याचे समोर या निमित्ताने समोर आले आले.
तहसिलदार शेख यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मोबाईलद्वारे संपर्क साधुन 3 हजार 700 रुपये किंमतीचा दारु साठा जप्त करुन
हाँटेलचे मालक सुनिल सुखदेव घुले यास आस्थपना उघडी ठेवली म्हणून दोन हजार रुपये दंड केला. तर राहुरी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क यांनी गुन्हा दाखल करुन हाँटेल मालकास ताब्यात घेण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम