अहमदनगर – सध्या सोशल मिडीया व्हाटसअॅप हे माध्यम मोठे लोकप्रिय ठरत आहे या अॅप चे कधी चांगले तर कधी वाईट परीणाम ही समोर येतात मात्र जिल्ह्यातील काही युवकांनी व्हाटसअॅप थेट सोयरीक जमविण्यासाठी वापर करत रविवारी दि.17 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे राज्यस्तरीय मराठा वधु-वर थेट भेट मेळावा आयोजित केला आहे
शेतकर्यांची मुले व मुली साठी तसेच उपवर वधु-वरांसाठी अपेक्षित सोयरीक मिळावी या उद्देशातुन जयकिसन वाघपाटील यांनी व्हाटसअप वर ’राजमाता जिजाऊ मराठा वधु-वर’ हा ग्रृप तयार केला या ग्रृपच्या माध्यमातून वधु-वर यांचे फोटो व बॉयोडाटा देवाणघेवाण सुरु झाली या माध्यमातून आवडलेल्या स्थळांना संबंधित पालकांनी संपर्क करुन सोयरीक जमविल्या गेल्या तीन वर्षांत 1100 जणांची सोयरीक जमविल्या गेल्या
त्यांचे लग्न मोठ्या उत्साहात पार पडले आहेत ग्रृप वर वधु-वर व त्यांच्या नातेवाईकांचा वाढता प्रतिसाद पाहून या ग्रृप चे मुख्य अॅडमिन अशोकराव दाणी, राजेश सरमाने ,हारीदास जगताप, बाळासाहेब वाकचौरे सौ.मायाताई जगताप सौ.शितलताई चव्हाण, लक्ष्मणराव मडके यांच्या सह त्यांच्या सहकार्यांनी वधु-वर मेळाव्याची संकल्पना मांडली
या राजमाता जिजाऊ मराठा वधु-वर ग्रृप ला राज्यभरातील सामाजिक कार्यकर्तेव महिलां एकत्र येऊन सर्व सामान्य शेतकर्यांचा खर्च आणि वेळ वाचावा तसेच त्यांचे मुलं आणि मुलींसाठी घरबसल्या चांगल्या स्थळांची माहिती मिळावी या उद्देशाने राज्यभरात जिल्हा व तालुकानिहाय ग्रृप तयार केले असुन आता गावनिहाय ग्रृप तयार करुन राजमाता जिजाऊ मराठा बॉयोडाटा बॅक करण्याचे नियोजन असुन समाजबांधवांच्या सहकार्याने मराठा समाज वधु-वरांच्या थेट भेट परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळावा रविवार दि.17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:00वा. शेतकरी निवास सभागृह,किसान क्रांती बिल्डींग,मार्केटयार्ड अहमदनगर येथे होणार आहे. मराठा समाजामध्ये स्थळ बघताना सरकारी नोकरी, हुंडा, सोंदर्य, इतर मालमता अशा अनेक अपेक्षा वाढल्यामुळे लग्न जमवणे ही प्रक्रिया अवघड झाल्याने मेळाव्याची गरज आहे असे मराठा सेवा संघाचे केंद्रिय कार्यकारणी सदस्य विठ्ठलराव गुंजाळ यांनी सांगितले.
या मेळाव्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे जोडीदार शोधता येतो. आता जिल्हानिहाय मेळावे असल्यामुळे इच्छुक वधूवरांनी व पालकांनी नाव नोंदणी करुन. आतापर्यंतराजमाता जिजाऊ मराठा वधु-वर मंडळ च्या माध्यमातून विविध जिल्ह्यात यशस्वी वधु-वर मेळावे झाले आहे. त्या मेळाव्यांच्या आजपर्यंत अनेक विवाह जमले आहेत. या मेळाव्यात वधु-वरांची नोंदणी होऊन वधू-वरांना त्याच दिवशी सर्व बायोडाटा नोंदणीची पीडीफ यादी देण्याचा विचार असुन वेबसाईट ला नोंदणी करणार आहोत आहे. मेळाव्याच्या ठिकाणी देखील नाव नोंदणी करता येईल.
या मेळाव्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, बीड, मुंबई, औरंगाबाद अशा अनेक विविध जिल्ह्यातील वधु-वर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये अनुरूप वधू-वरांना त्यांची ओळख, माहिती सांगून आपल्या जोडीदाराबद्दल असणार्या अपेक्षा व्यक्त करता येणार आहेत.
तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षाप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे. या मेळाव्या मध्ये वधूवरांनी स्वतःफोटो बायोडाटासह हजर राहावे. असे आवाहन अशोकराव दाणी, राजेश सरमाने ,हारीदास जगताप, चंद्रशेखर गुंजाळ,संपदाताई ससे, आशाताई साठे,अॅड अनुराधा येवले,रजनीताई गोंदकर,नंदा वराळे, मंदाताई निमसे,तारकराम झावरे , दत्तात्रय चव्हाण,रमाकांत बोठे, चंद्रशेखर गुंजाळ यांनी केले आहे.