अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- खासदार राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू आणि धडाडीने काम करणारा मित्र आपण गमावल्याची भावना आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात आमदार विखे म्हणाले, मागील काही दिवसांपासून राजीव सातव कोविड संकटाचा सामना करीत होते. यातून लवकर बरे होवून पुन्हा सक्रीय होतील, अशी अपेक्षा होती.
परंतु नव्या संसर्गाने त्यांची झुंज अपयशी ठरल्याने एक चांगला मित्र आपल्याला गमवावा लागला. राजीवजींनी अतिशय कमी कालावधीत राजकारणात आपली वेगळी छाप पाडली.
वैचारिक भिन्नता असली तरी सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांनी आपला स्नेह कायम ठेवला होता. राजकारणातील एक तरुण, उमदे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना आमदार विखे यांनी व्यक्त केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम