शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

Ahmednagarlive24
Published:

नागपूर :- शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने एका बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जखमी झाला.नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी येथून खापाकडे जात असताना हा अपघात झाला.

शरद पवार आज विदर्भातील नागपुरात आहे. या दौऱ्यात शरद पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला.

नागपूर जिल्ह्यातील जामगाव परिसरातून पवारांचा ताफा जात होता, त्यावेळी एका गाडीची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. नागपूर जिल्ह्यातील जामगाव येथून त्यांच्या गाडीचा ताफा जात असताना बाईकस्वाराला ताफ्यातील गाडीची धडक बसली.

यानंतर शरद पवारांच्याच ताफ्यातील गाडीने या जखमी बाईकस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या बाईकस्वारावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment