अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपची चर्चा गाजत आहे,नगरमध्ये नुकतेच प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘त्या’ प्रसंगाचा व्हिडिओ शूट करून एक बागायतदारावर हनी ट्रॅप रचला असल्याची घटना उघडकीस आली होती.
पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करून 1 कोटी रुपयांची मागणीही केली गेली. परंतु संबंधित बागायतदाराने पोलिसात धाव घेतली अन याचा पर्दाफाश झाला. संबंधित महिला व नगर शहरातील कायनेटिक चौकातील किराणा दुकानदार अशा दोघांना पोलिसांनी अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सदर महिला श्रीमंत लोकांना हेरून त्यांना शरीर संबंधाचे आमिष दाखवून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करत ब्लॅकमेल करत होती.
सदर महिलेने तिच्या साथीदाराच्या मदतीने अनेकांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करत त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळल्याची चर्चा आहे. पोलिसांनीही त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. ज्यांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे त्यांनी तक्रारीसाठी पुढे, यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नगर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमधील तरुणीने नगर शहरातील एक क्लासवन अधिकारी ही शिकार केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर येण्याची आता शक्यता आहे.
नगर तालुक्यातील जखणगावातील तीस वर्षाय तरुणी आणि नगर शहरातील एजंट दुकानदाराच्या हनीट्रॅपचा पर्दाफाश नगर पोलिसांनी केला. त्यानंतर या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले होते.
त्यानुसार शासकीय नोकरीतील एक क्लासवन साहेब फिर्याद देण्यास राजी झाले आहेत. त्यांची फिर्याद पोलीस नोंदवून घेणार आहे. दरम्यान या साहेबांच्या माहितीनुसार हनीट्रॅपमधील आरोपींची संख्याही वाढणार आहे.
तरुणीची शिकार झालेले क्लासवन साहेब हे नगर शहरात नोकरीला आहेत, सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार ते फिर्यादही देणार आहेत. आरोपींना ही माहिती कळाली तर ते पसार होतील, यामुळे पोलिसांनी ही बाब अत्यंत गोपनीय ठेवली आहे.
दरम्यान पहिल्या प्रकरणात एका ३० वर्षीय महिलेचा जखणगाव येथे आलिशान बंगला आहे. काही दिवसांपूर्वी तिने मोठा बागायतदार आणि व्यावसायिक असलेल्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढले. एप्रिल महिन्यात बंगल्यात बोलावून त्याला शरीर संबंध करण्यास भाग पाडले.
यावेळी व्हिडिओ चित्रीकरण करत त्या व्यावसायिकाकडे तब्बल एक कोटीची खंडणी मागितली. तसेच त्याला मारहाण करून त्याच्याकडील पैसे व दागिनेही लुटले.
महिलेचा त्रास असह्य झाल्याने शेवटी तो व्यावसायिक नगर तालुका पोलिसांकडे गेला आणि आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी सदर महिला व तिचा साथीदार अमोल मोरे याला अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम