अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळी कोविद सेंटरला भेट देत परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे.
मात्र मंत्री तनपुरेंचा असाच एक दौरा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कोविड सेंटरवर चांगले काम सुरु आहे.
राज्यमंत्री तनपुरे यांनी काही कोविड सेंटरलाच भेट दिली हे चांगले झाले. मात्र, त्यांना बाकीची कोविड सेंटर दिसली नाहीत का? फक्त दोन्ही काँग्रेस नेत्यांची कोविड सेंटर कशी दिसली? असा आरोप करत काँग्रेसने तनपुरेंच्या या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात १५ कोविड सेंटर सुरू आहेत. रविवारी प्राजक्त तनपुरे हे तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कोळगाव, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, श्रीगोंदा येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार होते.
आढळगाव, लोणी व्यंकनाथ, घारगाव, देवदैठण, लिंपणगाव, मढेवडगाव येथेही कोविड सेंटरच्या माध्यमातून रूग्णांना सेवा मिळत आहे. येथील कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की, तनपुरे यांनी कोविड सेंटरला भेट द्यावी. पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, अशी अपेक्षा होती.
मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. तनपुरे यांना राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांची कोविड कशी सेंटर दिसली? बाकी कोविड सेंटरला भेट देण्यासाठी वेळ का मिळाला नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम