अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते वादळामुळे भयावह परिस्थिती असून या वाऱ्याचा फटका सहारा शासकीय कोविड सेंटर मधील रुग्णांना बसू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार एफ.आर.शेख यांनी तातडीने संपूर्ण हॉल बंदीस्त करण्याच्या सूचना
दिल्यानंतर अवघ्या काही तासात ज्या भागातून वारा आत शिरतो तो भाग ग्रीन शेडने बंदीस्त केल्याने सर्व रुग्णांनी सुटकेचा निश्वास सोडत तहसीलदार शेख, मुख्याधिकारी अजित निकत व प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले.
राहुरीचे तहसिलदार शेख प्रशासनाचे प्रमुख या नात्याने काही निर्णय कटु घेत असले तरी तालुक्यातील नागरिक आपल्याच कुटुंबातील असल्याचे रुग्णांची आस्थेने चौकशी करताना प्रत्येक रुग्णाला जाणवत आहे.
गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाण वादळी वारे सुरू असून अनेक ठिकाणी छोट-मोठ्या दुर्घटना घडत आहे. देवळाली प्रवरातील सहारा मंगल कार्यालयात शासनाच्यावतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी अनेक रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
तर सध्या ५० पेक्षा जास्त रूग्ण उपचार घेत आहेत. सदर हॉल बंदिस्त नसल्याने वादळी वाऱ्यामुळे रुग्णांना त्रास होऊ शकतो.रुग्णही आपल्याच कुटुंबातील असल्याने तसेच वादळी वाऱ्याने रूग्णांची धावपळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन
राहुरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार एफ.आर.शेख यांनी व मुख्याधिकारी अजित निकत व तलाठी दिपक साळवे याच्याशी संपर्क करून तातडीने उपाययोजना करण्याचे सुचविले. त्यानुसार मुख्याधिकारी निकत यांनी सहारा कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन ग्रीन शेडच्या सहाय्याने संपूर्ण परिसर बंदिस्त करण्याबाबत कार्यवाही सुरू केली.
त्यानुसार अवघ्या काही तासात हा परिसर बंदिस्त झाला.रूग्णांना वादळी वाऱ्यापासून होणारा त्रास बंद झाला.वादळी वाऱ्याच्या भीती पासून सुटका मिळाली. तहसीलदार शेख व मुख्याधिकारी निकत यांनी तातडीने केलेल्या उपाययोजनेमुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले. तहसिलदार शेख व मुख्याधिकारी निकत यांचे रुग्णांनी हात जोडून आभार मानले.
धोका टाळण्यासाठी शासकीय कोविड सेंटर स्थलांतरीत करणार? :- पावसाचा भविष्यातील धोका लक्षात घेऊन सहारा लाँन्स मधील शासकीय कोविड सेंटर मधील रुग्णांना पावसाचा धोका होवू नये म्हणून देवळाली प्रवरा शहरातील मराठी शाळा, हायस्कुल, महाविद्यालय , सोसायटी मंगल कार्यालय आदी ठिकाणची पाहणी करुन वरील पैकी एका ठिकाणी शासकीय कोविड सेंटर स्थलांतरित करुन रुग्णांना पावसाचा धोका पोहचू नये यासाठी तहसिलदार शेख आता पासुनच काळजी घेत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम