लसीकरणामध्ये डाक कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या! पोस्टल कर्मचारी संघटनेची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- डाक विभागाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असून, कोविड काळातही डाक विभागातील सर्व सेवा सुरळीतपणे चालू आहेत.

डाक विभागातील कर्मचारी सर्व सेवा पूरवत आहेत परंतु शासनाने फ्रंट लाईन वर्कर मध्ये डाक विभागाचा समावेश न केल्याने कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये  प्राधान्य मिळत नसल्याने लसीकरण करून घेणेसाठी कर्मचाऱ्यांना मोठया त्रासास सामोरे जावे लागत आहे

त्यामुळे अजूनही मोठ्या संख्येने डाक कर्मचारी लसीकरणापासून वंचित आहेत. डाक विभागाचे पोस्टमन हे घरोघरी जाऊन टपाल वितरणाचे काम करत आहेत त्याचबरोबर इतर कर्मचारी सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा पुरवत आहेत.

या परिस्थितीचा सकारात्मकपणे विचार करत डाक विभागातील कर्मचारी यांना फ्रंट लाईन वर्कर समजून त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात यावे.

अशी आग्रही मागणी नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे नेते संतोष यादव यांनी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली. यावेळी उपायुक्त डांगे, भैय्या गंधे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe