जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अरबी समुद्रातील चक्री वादळाचा फटका अकोले तालुक्याला बसला.तालुक्यातील कळस बु येथील सुलतानपूर , गणोरे , येथे प्रत्येकी एक तर भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील मुतखेल येथे पाच घरे अवकाळी पावसाने पडले. सुदैवाने मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले. अकोले तालुक्यात रविवारी सायंकाळी आणि आज सोमवारी दिवसभरातील अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. जिल्हा प्रशासनाने पूर्व सूचना दिल्याने अनेकाचे नुकसान टळले. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते.

जोराचा वारा आणि पाऊसाची हजेरी सुरू राहिल्याने भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव घेतला. वादळी वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडाले कोहणे येथें वीज वाहिनीचे चार पोल पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला.

राजूर उपविभागात विजेचे तारांवर झाडे पडल्याने वीज पुरवठा करणारे 5 ते 6 फिडर बंद पडले होते मात्र वीज कर्मचाऱ्यांनी तत्काळ झाडे हटवून वीजपूरवठा सुरळीत केला.

शेतातील शेतकऱ्यांचे कांदा काढणीच्या काम ठीक ठिकाणी सूरु आहे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. काढणीचा कांदा व शेतात साठवलेला कांदा झाकण्यासाठीं धांदल उडाली .

अनेकांचा कांदा पावसाने भिजला .यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाला. अकोले शहर व परिसरासह तालुक्यातील समशेरपूर,सावरगाव पाट, टाहाकारी ,या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe