अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत बेकायदा जमीनीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगलदास बांदल आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त पोलिसाच्या शेतातील विहिरीतून जबरदस्तीने पाणी चोरी करत जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगलदास बांदल आणि त्याचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगलदास बांदल हा राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केलेला माजी प्रदेश उपाध्यक्ष आहे. गेल्या वर्षी एका खंडणी प्रकरणात बांदल राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती.
जमीन बळकावण्यासाठी त्रास देत असल्याची तक्रार बांदल यांच्याविरोधात आहे. सेवानिवृत्त पोलिस ज्ञानदेव तनपुरे यांनी बांदल यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात मंगलदास बांदल आणि त्याचा भाऊ बापूसाहेब बांदल या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानदेव तनपुरे यांच्या विहिरीतून बांदल आणि त्याचा भाऊ हे दररोज जबरदस्तीने सहा टँकर पाणी चोरुन नेत होते. तसेच तनपुरेंच्या मालकीची जमीन बळकावण्याचाही बांदल भावांचा प्रयत्न होता, असा तनपुरे यांचा आरोप आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम