अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-अँटी करप्शनच्या जाळ्यात पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे अडकला असून.नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्यात नछापा घालून ५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस पांडे याला ताब्यात घेतले.
अकोले तालुक्यातील अकोले पोलीस स्टेशन येथे सेवारत असणाऱ्या पांडे या पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
संगमनेर येथील एक तक्रारदार असून त्यांचे साडु व त्यांच्या दोन मुलांच्या विरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात दोन आरोपी विरुद्ध चॅप्टर केस लवकर करुन त्यांचा लगेच जामीन करुन देणे साठी व त्यातील उर्वरित एक आरोपीचे विरुद्ध चॅप्टर केस न करता त्याचे नाव गुन्ह्यतून नाव कमी करण्यासाठी आरोपी लोकसेवक पोलीस नाईक पांडे यांने ५,०००/- रु लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अहमदनगर विभागाकडे दिलेल्या तक्रारी वरुन केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांच्याचकडे ५०००/- रु लाचेची मागणी पंचा समक्ष केल्याचे उघड झाले.
आज दि.१८ रोजी अकोले पोलीस स्टेशन येथे आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक यांनी ५000/- रु लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता आरोपी पोलीस नाईक पांडे यास रंगेहाथ पकडण्यात आले.
श्री सुनील कडासने ( पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक) .श्री निलेश सोनवणे ( अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक),विजय जाधव,
(वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.) यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी दीपक करांडे, (पोलिस निरीक्षक ला.प्र.वि, अहमदनगर )सुपरविजन अधिकारी हरिष खेडकर, (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर) यांनीं ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम