अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- संचारबंदी व नंतर काही प्रमाणात टाळेबंदी लागू केल्यानंतरही शहरातील करोना संसर्ग रुग्णसंख्या सातत्याने वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी निर्बंध अधिकच कडक केले आहेत.
वैद्यकीय सेवा व दूध विक्री वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तर भाजीपाला विक्री बंद राहणार असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

आता या निर्णयामुळे बळीराजा चांगलाच संतापला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
किसान सभा प्रतिनिधी, कृषीमाल उत्पादक, मार्केटयार्डमधील कृषीमाल फळे व भाजीपाला विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, सहकार निबंधक कार्यालय प्रतिनिधी,
कृषी विभाग (आत्मा) प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांचा शेतमाल भाजीपाला व फळे मनपा हद्दीतील नागरिकांना कसा पुरवता येईल हे लवकरात लवकर ठरवावे,
अन्यथा आयुक्तांच्या निवासस्थानी शनिवारी (२२ मे ) सकाळी ११ वाजलेपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम