अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशातील काही राज्यांवर घोंघावणारे तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका अनेक जिल्हयांना बसला आहे. यातच या वादळाचा मोठा आर्थिक फटका नगर जिल्ह्याला बसला आहे.
जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळ आणि जोरदार वार्यामुळे 20 गावातील 56 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.
कृषी विभागाने मंगळवारी केलेल्या पंचनाम्यामध्ये नगर तालुक्यातील 3 गावांत 2 हेक्टर 8 गुंठे क्षेत्रावर 4 शेतकर्यांचे आंबा पिकाचे,
पारनेर तालुक्यातील 14 गावांत 40 हेक्टर 2 गुंठे क्षेत्रावर 51 शेतकर्यांचे आंबा पिकाचे, कोपरगावातील 2 गावांत 9 शेतकर्यांचे 7 हेक्टरवर आणि श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात 5 हेक्टर 6 गुंठे क्षेत्रावर 3 शेतकर्यांचे आंबा पिकाचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.
चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका :- चक्री वादळाचा महावितरणला जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. चक्री वादळामुळे जिल्ह्यातील 25 उपकेंद्रे, 344 वाहिन्यांचा, 9 हजार 341 रोहित्र आणि 552 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
तर काही भागात सुरक्षेसाठी तो बंद करावा लागला होता. यामुळे बंद पडलेली सर्वच 25 विद्युत उपकेंद्रे 338 वाहिन्यांचा, 9 हजार 63 रोहित्र आणि 545 गावांचा विद्युत पुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत सुरु करत कोलमडलेली यंत्रणा दुरुस्त करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम