अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- मी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सल्ला दिला होता. पण मी सल्ला देण्याआधीच केंद्रीय रसयान आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवियायांच्या मंत्रालयाने प्रयत्न सुरु केले असल्याची मला कल्पना नव्हती.
योग्य दिशेने जात असल्याबद्दल मला आनंद आहे. त्यांचं अभिनंदन करतो. हे रेकॉर्डवर ठेवणं मला महत्वाचं वाटतं, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
गडकरी म्हणाले, स्वदेशी जागरण मंचकडून आयोजित परिषदेनंतर त्यांनी मला केंद्र सरकार १२ वेगवेगळ्या प्लांट/कंपनींकडून लसनिर्मितीसाठी मदत घेत असून या प्रयत्नांमधून भविष्यात निर्मिती वाढण्याची अपेक्षा आहे असं त्यांनी मला कळवलं.
लसनिर्मितीसाठी जास्तीत जास्त कंपन्यांना परवाना दिला पाहिजे. जर मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर समस्या निर्माण होते. एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना तसंच रॉयल्टी द्या,” असं नितीन गडकरी यांनी सुचवलं होतं.
तसंच लसनिर्मिती वाढवण्यासाठी फॉर्म्युला देशभरातील इतर प्रयोगशाळांसोबत शेअर केला पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं होतं. “माझी खात्री आहे की, प्रत्येक राज्यात किमान एक ते दोन अशा प्रयोगशाळा असतील ज्यांच्याकडे क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील.
त्यांच्यासोबत फॉर्म्युला शेअर करा आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी समन्वय साधा. नंतर ते देशात पुरवठा करतील. निर्मिती जास्त असेल तर ते निर्यातही करु शकतील. हे १० ते १५ दिवसांत केलं जाऊ शकतं,” असं नितीन गडकरी म्हणाले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम