अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर बँकांनी त्यांचे कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या कठीण काळात देखील बँक कर्मचारी सेवा देत आहेत.
यामूळेच सरकारी बँकांव्यतिरिक्त आपल्या कर्मचार्यांचे प्राण वाचवण्यासाठी खासगी क्षेत्रातील बँकांनीही काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत.
यावेळी बहुतेक बँकांनी त्यांचे कामकाजाचे तास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मर्यादित केलेत. लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन बँकेच्या शाखेत केवळ चार सेवा सुरू आहेत.
यात पैसे ठेव, पैसे काढणे, चेक ठेव, ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटी आणि सरकारी चालान सेवेचा समावेश आहे.
एसबीआयने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार बँकेत आता फक्त 4 कामे होणार :-
- (1) पैसे ठेवणे आणि पैसे काढणे
- (2) संबंधित कामांची तपासणी करा
- (3) डीडी अर्थात डिमांड ड्राफ्ट/आरटीजीएस/एनईएफटीशी जोडलेले कार्य
- (4) शासकीय चालान
बिहारमध्ये कार्यरत असलेल्या बँक शाखा 31 मेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यरत राहतील. बिहारमधील बँकांनी हा निर्णय घेतला आहे, कारण राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधी 31 मेपर्यंत वाढविलाय.
एसबीआय, कॅनरा बँक, पीएनबी, एचडीएफसी बँकेसह सर्व सरकारी आणि खासगी बँक शाखांमध्ये ही वेळ लागू असेल. मागील वर्षी कोरोनामुळे सुमारे 600 बँकर्स मृत्युमुखी पडलेत.
अशा परिस्थितीत यंदा कोरोनाची नवीन लाट आली, तेव्हा बँक संघटनेने कामासंदर्भात अद्ययावत एसओपी देण्याचे आवाहन केले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम