तरुणाला गजाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- तूम्ही शेतात कसे आले, हे क्षेत्र माझे आहे. असे म्हणत चार जणांनी मिळून प्रथमेश शिंदे या तरूणाला गज मारुन तसेच लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना १८ मे रोजी राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे घडली आहे.

प्रथमेश संपत शिंदे वय १८ वर्षे, राहणार सात्रळ ता. राहुरी. या तरूणाने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १८ मे रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान प्रथमेश शिंदे व त्याचे चूलते संजय रामनाथ शिंदे,

चुलत भाऊ निलेश संजय शिंदे व आजी अनुसया रामनाथ शिंदे हे सर्वजण शेतात काम करीत असताना आरोपी प्रदिप ज्ञानदेव शिंदे, सर्जेराव बाबुराव शिंदे, अथर्व सर्जेराव शिंदे, ललित सर्जेराव शिंदे सर्व राहणार सात्रळ ता. राहुरी हे चारजण त्या ठिकाणी आले.

यावेळी प्रदिप ज्ञानदेव शिंदे हा त्यांना म्हणाला की, तूम्ही शेतात कसे आले. हे क्षेत्र माझे आहे. या कारणावरुन शिवीगाळ दमदाटी करुन प्रदिप ज्ञानदेव शिंदे याने प्रथमेश याच्या डोक्यात गज मारुन जबर दुखापत करत गंभीर जखमी केले तसेच

इतर तिघांनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे. प्रथमेश शिंदे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत 1) प्रदिप ज्ञानदेव शिंदे 2) सर्जेराव बाबुराव शिंदे 3) अथर्व सर्जेराव शिंदे 4) ललित सर्जेराव शिंदे या चार जणांवर गुन्हा रजि. नं. व कलम – I 377/2021 भा. द. वि. कलम 326, 447, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

घटनेनंतर पोलिसांनी चारही आरोपींना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाकडून त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आण्णासाहेब चव्हाण हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News