हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला,पंचनामे करण्याची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  तौक्ते वादळाचा फटका ग्रामीण भागालाही बसला आहे.वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे फळबाग उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळत आहे.

जोरदार वाऱ्यामुळे डाळिंब, आंबा, निमोनी आदी झाडांची फळे गळून पडले आहेत. वेगवान वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली आहेत.

आंबा पीक केशर, हापूस, लंगडा या जातींचे काढणीस आलेली फळे वाऱ्यामुळे गळून पडले आहेत. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे.

निसर्गाच्या या वादळी फटकाने मोठे नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी परिसरातील फळबाग उत्पादकांच्या वतीने विश्वास कडू, संजय नागरे, वसंतराव डुकरे,

किशोर कडू, गणेश कडू, उदयराज कडू, दौलत नागरे, आदी नी केली आहे. तसेच या वादळाने इतर चार पिके, भाजीपाला याचे ही नुकसान झाले आहे.

तसेच या झालेल्या नुकसान ज्या फळबाग उप्त्पादक शेतकऱ्यांचे फळबागांचे विमा उतरवला नाही. त्यांनाही राष्ट्रीय आपत्ती निधीतून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News