पैशासाठी मयत कोरोनाबाधितावर ३ दिवस उपचार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नांदेड शहरात कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाइकांची खासगी हॉस्पिटलकडून मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. याकडे जिल्हा व मनपा प्रशासनाकडून सोयिस्कर डोळेझाक होत आहे.

शहरातील हिंगोलीगेट परिसरात असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला कोरोनाबाधित रुग्ण २१ एप्रिल रोजी मरण पावल्यानंतरही मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याच्यावर ३ दिवस उपचार केल्याचे दाखवून

तब्बल ४२ हजार रुपये जास्तीचे बिल रुग्णाच्या नातेवाइकांना दिले. त्यानंतर २४ तारखेला रुग्ण मरण पावल्याचे सांगितले.

याप्रकरणी संबंधित शिवाजीनगर पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे रुग्णाच्या पत्नीने न्यायालयात दाद मागितली.

न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून शिवाजीनगर पोलिसांनी गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

नांदेड शहरात गल्लोगल्ली कोविड हॉस्पिटल सुरू झाले आहेत. या हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्तांची व त्यांच्या नातेवाइकांची लूट चालू आहे.

अनेक हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटलमध्ये लागणारी यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टर, साधनसामुग्री नसतानाही मनपा प्रशासनाने त्यांना मान्यता दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News