तब्येतीची काळजी घे, पवारांचा अहमदनगर जिल्ह्यातील त्या आमदारास सल्ला !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात बाधित रुग्णांसाठी तू करीत असलेले काम अतिशय उत्तम आहे. तुझी जबाबदारी तू प्रामाणिकपणे पार पाडीत आहे.

मात्र, या संकटात तू जशी इतरांची काळजी घेतो, तशीच काळजी तुझ्या देखील तब्येतीची घे, असा भावनिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिला.आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली.

आपण दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याची माहिती देऊन मतदारसंघात कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आमदार काळे यांनी पवार यांना दिली.

इंधनाच्या वाढत्या दराने शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे. तरी देखील खतांच्या वारेमाप किंमती वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत अाहेत.

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी शरद पवार यांनी पाऊल उचलले त्याबद्दल त्यांचे आमदार काळे यांनी आभार मानले.

दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता तू करीत असलेल्या धडपडीचा व तुझ्या उपाय योजनांचा नागरिकांना निश्चितपणे उपयोग झाला. कोणतेही संकट कायमस्वरूपी नसते.

कोरोना संकटात नागरिकांसाठी तू करीत असलेल्या कार्यात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारची मदत लागली, तर मदत करण्याची ग्वाही देऊन तब्येतीची काळजी घेण्याचा पवारांनी सल्ला दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News