बालिकाश्रम रोडवर दोन गटांमध्ये दगडफेक

Ahmednagarlive24
Published:
अहमदनगर : शहरातील बालिकाश्रम रोडवरील पोलिस कॉलनीजवळ जुन्या भांडणाच्या कारणातून दोन गटांमध्ये हाणामाऱ्या होऊन दगडफेक झाली. 

 

त्यात दोन्ही गटांतील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी परस्परांविरुद्ध जीवे मारण्य़ाचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, दंगा करणे या कलमांनुसार तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

विठ्ठल नंदू जाधव, आकाश पांडुरंग जाधव, भारत बाबूराव जाधव, आदित्यनाथ वनाजी जाधव अशी काही जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment