अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या अाजाराने आधीच नागरिक त्रस्त झाले असताना आता व्हाइट फंगस (कँडिडोसिस) या नव्या आजाराचा धोका वाढला आहे.
या व्हाइट फंगसचे रुग्ण बिहारमधील पाटण्यात चार रुग्ण आढळले आहेत. व्हाइट फंगस (कँडिडोसिस) हा फुफ्फुसासोबतच त्वचा, नख, तोंडाच्या आतील भाग, पोट आणि आतडे, किडनी, गुप्तांग आणि मेंदुला संक्रमित करतो. ब्लॅक फंगससारखीच व्हाइट फंगसची कारणे आहेत.
रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असणे, डायबिटीज, अँटीबायोटिकचे सेवन किंवा अनेक दिवसांपासून स्टेरॉईड घेत असलेल्या रुग्णांना व्हाइट फंगसचा धोका आहे. हे नवजात बाळांमध्ये डायपर कँडिडोसिसच्या रुपात होते. लहान बाळांमध्ये पांढरे डाग दिसतात.
महिलांमध्ये हे ल्यूकोरियाचे मुख्य कारण आहे. या फंगसपासून वाचण्यासाठी ऑक्सिजनवर किंवा व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांच्या आसपास स्वच्छता असावी. त्यांना वापरण्यात येणारी सर्व उपकरणे योग्यरित्या सॅनिटाइज करुन घ्यावीत.
ऑक्सीजन सिलेंडर ह्यूमिडिफायरमध्ये स्ट्रेलाइज पाणी वापरावे. रुग्णाच्या शरीरात जाणारे ऑक्सिजन फंगसमुक्त असावे. अशा रुग्णांच्या बलगमच्या फंगस कल्चरची तपासणी वेळोवेळी व्हावी. याबाबत माहिती देताना PMCHमधील मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एसएन सिंह म्हणाले,
आतापर्यंत असे चार रुग्ण आढळली आहेत, ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे होती, पण त्यांना कोरोना झालेला नसून व्हाइट फंगस झाला होता. या रुग्णांच्या रॅपिड अँटीजन, रॅपिड अँटीबॉडी आणि आरटी-पीसीआर निगेटिव्ह आल्या होत्या. फक्त अँटी फंगल औषधांनी ठीक झाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम