धक्कादायक माहिती समोर ! कारागृहात असतानाही बाळ बोठेने केले ‘त्यांना’ फोन !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

पारनेर येथील कारागृहात कैद्यांकडे सापडलेल्या मोबाईलवरून आरोपी बाळ बोठे याने काही फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या महिन्यात उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती.

यावेळी कारागृहातील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डिले यांच्याकडे अंगझडतीत दोन मोबाईल सापडले होते.

आरोपींनी हे मोबाईल पाणी बाहेर जाण्याच्या पाईपमध्ये लपवून ठेवले होते. रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बोठे याने देखील या मोबाईलचा वापर केला असल्याचा संशय पोलिसांना होता.

त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास केला असता बोठे याने देखील त्या मोबाईलचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे हा सध्या पारनेर उपकारागृहात असून त्या कारागृहात सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोठेने वकिलांना फोन केले आहेत.

मागील महिन्यात दोन आरोपीकडे दोन मोबाईल आढळून आले होते. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

त्यांना गुन्ह्यात सहभागी करून घेतले असून आणखी काही आरोपींनी मोबाईलचा वापर केल्याचे समोर आले असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News