हनीट्रॅप प्रकरण : ‘त्या’ तरूणीच्या घरात महत्वाची कागदपत्रे सापडली !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यत ‘हनीट्रॅप’च्या अनेक घटना गेली काही महिने चर्चित होत्या. परंतु त्यातील हा पहिलाच गुन्हा जिल्ह्यत दाखल झाला आहे. आणि त्यानंतर धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. 

नगर तालुका पोलिसांनी जखणगाव येथे सुरु असलेल्या हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  आता या आरोपींची अनैतिक कृत्ये समोर येण्यास सुरुवात झाली आहे 

नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅप प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याचे चारचाकी वाहन जप्त केले आहे. 

दरम्यान संबंधीत तरूणीच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असून, या ठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. यात बँकेचे कागदपत्र सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 

तसेच तिच्याकडे असलेल्या मोबाईल वरून तिने आतापर्यंत कोणाकोणाला कशा कशा पद्धतीने संपर्क केला, तसेच तिच्याकडे कोणकोणते व्हिडिओ आहे. याचा पोलिसांनी आता शोध सुरू केला आहे.

दरम्यान, तरूणीसह तीचा एजंट अमोल सुरेश मोरे यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पहिल्याच गुन्ह्यात 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

नगर तालुका पोलिसांनी हनीट्रॅप प्रकरण उघडकीस आणले. याची पहिली फिर्याद तालुक्यातील एका बागतदाराने दिली. यानंतर एक क्लासवन अधिकारी यात अडकल्याचे समोर आले. त्याने हिंमत दाखवित फिर्याद दिली. 

सुरूवातीला संबंधीत तरूणीसह तीचा एजंट मोरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.यात आता आरोपींची संख्या वाढत आहे. दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात संबंधीत तरूणीसह एजंट मोरे व त्यांना मदत करणारे सचिन भिमराज खेसे, सागर खरमाळे, महेश बागले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

नगर शहरात गेली काही महिने ‘हनीट्रॅप‘ची प्रकरणे गाजत आहेत. त्याची चर्चा समाजमाध्यमातून विविध प्रकारे होत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप पोलिसांकडे कुणी तक्रार दिलेली नव्हती आणि त्या प्रकरणाशी संबंधितच एक खूनप्रकरण राज्यभर गाजले. 

या खून व हनीट्रॅपच्या घटनेचा तसेच नगर तालुका पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींचा परस्परांशी काही संबंध आहे का, यादृष्टीने तपास केला जात  आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe