पंतप्रधान देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली.

मात्र, महाराष्ट्रासाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

याचीच री ओढत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, मोदी दिलदार असून ते महाराष्ट्राला 1500 कोटी देतील, असा खोचक टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून तत्काळ मदत केली.

मोदींचे संपूर्ण देशाकडे लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला नक्की मदत करतील व चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र राज्याला 1500 कोटींची मदत देतील. मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही कधीतरी वळेल. ते दिलदार आहेत असे संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत. मोदींनी गुजरातचा दौरा केला. मात्र, चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला असताना ते इकडे फिरकले नाहीत.

त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टिका केली. नरेंद्र मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन विचारला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe