अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोवीड सेंटरमध्ये साफसफाई करणाऱ्या दोन कामगारांनी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पाकीट चोरून३०हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली आहे.
यातील रोख रकमेसह एटीएम, आधारकार्ड, ओळखपत्र असे साहित्य चोरुन नेले आहे. याप्रकरणी त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
मात्र संबंधित दोघेजण पसार झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेल्या गावातील एका कोवीड सेंटरमधे ते अधिकारी वैद्यकीय सेवा करत आहेत.
त्याच कोवीड सेंटरमधे साफसफाईचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी दि.१७ मे च्या रात्रीपासुन ते दि.१८ मे २०२१ च्या दुपार पर्यंत काम करीत होते.
या दरम्यान या दोघांनी या डॉक्टरचे पाकीटच लंपास केले आहे. यात ३० हजार रुपये रोख व इतर साहीत्य होते. याबाबत पोलिसांनी त्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र ते दोघेही पसार झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम