‘या’ अटीमुळे अनेकजण म्हणतात ‘ती’ लसच नको… रे… बाबा!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  सध्या ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने दररोज जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना तपासण्या करून ग्रामीण भागातील ॲक्टिव रूग्ण शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

त्यातच लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. परंतु लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे जर या गर्दीत कोरोनाबाधित रुग्ण असल्यास त्यापासून अनेकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा धोका लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यापुर्वी प्रत्येक नागरिकाला कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे.

ही तपासणी केल्यानंतरच लस दिली जाते. या अटीमुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आता कमी होत असल्याचे दिसत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने कोरोना चाचणी करणे आरोग्य विभागाने बंधनकारक केले आहे.

त्यामुळे आरोग्य केंद्रात पूर्वीप्रमाणे लस घेण्यासाठी होणारी गर्दी आता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ग्रामीण भागात तर अनेकांनी या कोरोना चाचणीचा चांगलाच धसका घेतला आहे.

कोरोना चाचणी होणार असेल तर आपल्याला ‘ती’ लसच नको ..रे.. बाबा! असे म्हणण्याची वेळ काहीवर आली आहे.

त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गर्दी कमी झाल्याने आता लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यां वरील ताण देखील काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे लसीकरण सुरळीत पार पडत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe