अंगावर रॉकेल ओतून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- पती-पत्नीतील वादातून एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर घडली.

गणेश चंद्रभान गायकवाड वय ३१ रा. खांडगाव याने शहर पोलीस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतले.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

गणेश याची पत्नी त्याचेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देत असताना तो पोलीस स्टेशन समोर मोठमोठयाने ओरडून मला माझी मुलगी ताब्यात दे असे म्हणत होता.

मुलीस आईकडे ठेवायचे की वडिलांकडे ठेवायचे याबाबत चर्चा सुरू असताना गणेशाने पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत हे.कॉ. बन्­सी टोपले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश गायकवाड याच्याविरुद्ध भादवि कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe